पुणे, नाशिकनंतर आता मुंबईतही गाड्यांची जाळपोळ

पुणे, नाशिकनंतर आता मुंबईतही गाड्यांची जाळपोळ

  • Share this:

vlcsnap-7879-07-03-04h51m17s546

27 मार्च : पुणे, नाशिकनंतर वाहन जळीतकांडाचे लोण आता मुंबईतही येऊन पोहोचले आहे. भांडूपच्या श्रीरामपाडा परिसरात मोठया प्रमाणावर वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भांडूपच्या श्रीरामपाडा परिसरात रात्री 2च्या सुमाराला 13 मोटरसायकल आणि 2 कारची जाळपोळ करण्यात आली.

पार्किंगची जागा किंवा व्यक्तीगत वादातून ही जाळपोळ करण्यात आल्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे. मात्र, अद्यापही आरोपींबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी नाशिक, पुण्यात अनेकदा बाईक जळीतकांड समोर आलं होतं. मात्र, आता असाच प्रकार मुंबईत घडल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तसंच आरोपींना अटक करण्याचंही मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 27, 2017, 8:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading