बायकोच्या हाताला इतका गुण आहे हे कळलं असतं तर राजकारणात आलो नसतो - शरद पवार

बायकोच्या हाताला इतका गुण आहे हे कळलं असतं तर राजकारणात आलो नसतो - शरद पवार

  • Share this:

pawar 01

26 मार्च : बायकोचा हातगुण चांगला हे मला पन्नास वर्षानंतर समजले. पण आता समजून उपयोग नाही. नाहीतर मी राजकारणात आलो नसतो, हे उद्गार आहेत शरद पवार यांचे.बारामतीत 'चंदुकाका सराफ & सन्स प्रा.लि.'च्या उद्घाटन सोहळ्यात शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार एकत्र होते.

यावेळी शरद पवार यांनी 'माझी बायको कुठे जात नसते. मात्र कुठे उद्घाटनाला जायचेच असेल तर ती फक्त सराफांच्या दुकानांच्या उद्घाटनाला जाते. धंद्यामध्ये तिच्या हाताला इतका गुण आहे हे मला आधी कळले असते तर मी राजकारणात आलो नसतो. पन्नास वर्षात मला समजले नाही आणि आता समजूनही उपयोग नाही,' असे मिष्किल उद्गार शरद पवार यांनी काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या