गेले रवींद्र गायकवाड कुणीकडे?

गेले रवींद्र गायकवाड कुणीकडे?

  • Share this:

ravindra-gaikwad

26 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणानंतर कालपासून खासदार रवींद्र गायकवाड गायब आहेत.प्रसार माध्यमं, कार्यकर्ते, नातेवाईकांच्या सुद्धा ते संपर्कात नाहीत.माध्यमाचे प्रतिनिधी जेव्हा खासदारांचा शोध घेत उमरग्यातील घरी गेले असता रवींद्र गायकवाड हे घरीही नाहीत. आज ते घरी येणार होते,मात्र ते घरी आलेच नाहीत, असं सांगण्यात आलं.

खासदार गायकवाड लोकसभेत एअर इंडिया कंपनीवर हक्क भंग आणणारहेत.गायकवाड यांच्यावरही जो गुन्हा दाखल झालाय त्याची कायदेशीर पूर्तता करण्याच्या कामात व्यस्त असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिलीय.दरम्यान पाडव्याचा सण साजरा करण्यासाठी ते घरी येतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान,खासदार रवींद्र गायकवाडांवर टीका होत असताना त्या विमानातून प्रवास करणाऱ्या एअरहोस्टेसनं गायकवाड यांची बाजू घेतलीये. गायकवाड हे शांत होते. त्यांना एअर इंडियाच्या वरिष्ठांशी बोलायचं होतं पण त्यांच्याशी कोणचं वरिष्ठ बोलायला आलं नाही त्यामुळे त्यांचा पारा चढला. पण शिवकुमार यांना मारहाण झाल्याचं मात्र त्या एअर होस्टेसनं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2017 07:29 PM IST

ताज्या बातम्या