बंदरांच्या विकासातून होणारा नफा महाराष्ट्रासाठीच- नितीन गडकरी

बंदरांच्या विकासातून होणारा नफा महाराष्ट्रासाठीच- नितीन गडकरी

  • Share this:

FOR WAB02

26 मार्च : राज्यातल्या बंदरांचा विकास होत असताना व्यापारातून जो नफा होतो तो नफा दिल्लीला न नेता महाराष्ट्रातच वापरणार असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड बंदराचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

कोकणातलं सर्वात आधुनिक बंदर असा जयगड बंदराचा लौकीक आहे. या बंदरातून प्रामुख्यानं कोळसा आयात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सागरमाला प्रकल्पांतर्गत जिंदाल कंपनीने उभारलेल्या कोकणातल्या सर्वात मोठ्या अद्ययावत बंदराचं देशाला लोकार्पण करण्यात आलं. हे बंदर रेल्वे मार्गाने पश्चिम महाराष्ट्राला जोडलं जाणार असून त्यासाठी जयगड ते डिंगणी या रेल्वेमार्गाचंही भूमिपूजन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी केलं.

जयगड खाडीत उभारण्यात आलेल हे बंदर कंपनीकडून प्रामुख्याने कोळसा आयातीसाठी वापरण्यात येणार असल तरी यामुळे अनेक प्रकारच्या मालाची आयात निर्यात सोपी आणि कमी खर्चात होणार आहे. या सगळ्याचा फायदा भारताच्या व्यापारवाढीला होणार असून कोकणच्या विकासातही या बंदराचं मोठं योगदान मिळणार असल्याचा विश्वास यावेळी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 26, 2017, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading