S M L

मराठवाड्यात 'नीट' परीक्षेसाठी एकच केंद्र,विद्यार्थ्यांनी करायचं काय?

Sonali Deshpande | Updated On: Mar 26, 2017 05:56 PM IST

मराठवाड्यात 'नीट' परीक्षेसाठी एकच केंद्र,विद्यार्थ्यांनी करायचं काय?

26 मार्च : देशभरात येत्या ७ मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात नीट घेतली जाणार आहे. यंदा नीटच्या परीक्षेसाठी मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहिलाय.संपूर्ण मराठवाड्याकरता फक्त एक परीक्षा केंद्र ठेवलंय. औरंगाबाद शहरात.

म्हणजे अक्कलकोटमध्ये राहणारा कुणी विद्यार्थी असेल त्याला 330 किलोमीटर प्रवास करावा लागेल. परीक्षा सकाळी असते. म्हणजे एक दिवस आधी जाऊन तिथे राहणं आलं. म्हणजे हॉटेलचा खर्च. खाण्यापिण्याचा खर्च. औरंगाबादला जाण्या-येण्याचा खर्च.



उन्हाळ्याच्या सुट्टीत ट्रेनचं आरक्षण मिळणं कठीण.म्हणजे खासगी बसनं जादा पैसे देऊन जा. हे सगळं कशासाठी तर नीटच्या आयोजकांना मराठवाड्यात दोन ते तीन परीक्षा केंद्र असावी, असं वाटत नाही म्हणून.

मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई आणि ठाणे अशी दोन केंद्र.पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नगर अशी 4 केंद्र.विदर्भासाठी नागपूर आणि अमरावती. पण मराठवाड्यासाठी मात्र फक्त एक. परीक्षा केंद्र वाढवलीच पाहिजेत, अशी मागणी नीटचे विद्यार्थी करतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2017 02:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close