परीक्षेसाठी काही पण...गायीवर बसून गाठलं परीक्षा केंद्र

परीक्षेसाठी काही पण...गायीवर बसून गाठलं परीक्षा केंद्र

  • Share this:

cow

26मार्च : गरिबीमुळे शिक्षण सोडलेल्या, परिस्थितीशी दोनहात केलेल्या अनेक सुरस कथा आपण ऐकल्यात मात्र अहमदनगरच्या ध्येयवेड्या विद्यार्थ्यांनं बससाठी पैसे नसल्यानं चक्क गायीवर परीक्षा केंद्र गाठून पेपर दिला. कर्जतच्या निमगाव डाकूतील विजय काळे या दहावीच्या विद्यार्थ्यांनं ही कमाल केलीय.

बुधवारी विजयचा इतिहासाचा पेपर होता. मात्र विजयकडे बसच्या भाड्यासाठी ४४ रुपये नव्हते. त्यामुळे त्यानं बैलावर बसून 19 किलोमीटरचं अंतर कापून परीक्षा केंद्र गाठलं. शिक्षणावर आणि शाळेवर प्रेम असल्यानं कशाचीही तमा न बाळगता तो गायीवर पेपरला गेला. रस्त्यानं वाहनांच्या आवाजानं गाय दबकत होती.मात्र शेवटी पठ्ठ्यानं परीक्षा केंद्र गाठून पेपर दिलाच.

गाईमुळेच परीक्षा दिल्याचं तो अभिमानानं सांगतोय. विजय हा पारधी समाजातील होतकरू विद्यार्थी असून दहावीपर्यतचं शिक्षण त्यानं हलाखीत पूर्ण केलं. विजयचे पालक मोलमजुरी करत असल्यानं परिस्थिती हलाखीची आहे. गावापासून त्याच्या परीक्षा केंद्रावर येऊन जाऊन ४४ रुपये लागतात. परीक्षांच्या काळात काम मिळालं नाही म्हणून पैसेही नाही. विजयच्या घरी आई वडील आणि दोन भावंडं.

विजय परीक्षेसाठी गाईवर गेल्यानं आई धास्तावली होती मात्र विजय पेपर देऊन सुखरुप घरी परतल्यानं तिचा जीव भांड्यात पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 26, 2017, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading