नाशिकमध्ये कुल्फी खाल्ल्याने 55 मुलांना विषबाधा

नाशिकमध्ये कुल्फी खाल्ल्याने 55 मुलांना विषबाधा

  • Share this:

asdiajspy

25 मार्च : उन्हाळा सुरू होताच थंडपेय, ज्यूस, कुल्फी, आईसक्रीम खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो. अशाच प्रकारे नाशिकमधील बहिराणे गावातील मुलांनी कुल्फी खाल्ली मात्र, त्यानंतर या चिमुरड्यांना विषबाधा झाली आहे.

सुदैवाने सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहिराणे, चिराई आणि आसपासच्या गावांमध्ये कुल्फी खाल्याने जवळपास ५५ जणांना विषबाधा झाली आहे. यात सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना नामपूर इथल्या ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायकलीवरून परप्रांतीय फेरीवाला कुल्फी विकण्यासाठी या परिसरात आला होता. या कुल्फीवाल्याकडून घेतलेली कुल्फी खाल्ल्यानंतर मुलांना उलटी आणि जुलाब होण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी अधिक तपास नामपूर पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 08:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading