खासदार रवींद्र गायकवाड अखेर सापडले

  • Share this:

Gaiwade13

24 मार्च :  एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारून टिकेचे धनी ठरलेले उस्मानाबाद शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे आज सकाळ पासून गायब झाले होते. पण अखेर त्याचा पत्ता लागला असून ते पुणेमार्गे उमरग्याला रवाना झाले आहेत.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी एअर इंडियानंही खासदार गायकवाड यांचं नवी दिल्ली ते पुणे हे विमानाचं तिकीट काल रद्द केलं होतं. त्यांनंतर शुक्रवारी संध्याकाळी 4.45 च्या ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने रवींद्र गायकवाड यांनी निजामुद्दीन स्टेशनवरुन एका खासदाराचे सहकारी बनून निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान माध्यमाच्या प्रतिनिधींशी त्यांनी हुज्जत घातली. त्यानंतर नियोजीत वेळेनुसार ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस ट्रेन मुंबई सेट्रलला पोहोचली. मात्र, या ट्रेनमध्ये गायकवाड नव्हते.

पण, गायकवाड सर्वांच्या नजारा चुकूवून त्याच ट्रेनमधून मुंबईत दाखल झाले होते. आतपर्यंत जी माहिती मिळालेल्या माहितीनुसार ते मुंबई स्टेशन येण्याअगोदरच रेल्वेतून उतरले आणि कार्यकर्त्यांसह खाजगी गाडीतून निघून गेले. आज ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुण्याला जाणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची प्रत्यक्षात भेट न घेता, फोनवरूनच त्यांच्याशी चर्चा केल्याचं समजतय. त्यानंतर गायकवाड मुंबईहून पुणेमार्गे उमरग्याला रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 07:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading