भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'ला वेग, अनेक आमदार भाजपच्या वाटेवर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2017 07:28 PM IST

bjp-flag.jpg.image.784.410

25 मार्च : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. विरोधी पक्षाचे अनेक आमदार भाजपच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या या फोडाफोडीच्या ऑपरेशनला ऑपरेशन लोटस असं म्हंटलं जातंय. यानुसार विरोधी पक्षाचे 13 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या या प्लॅन बीला शह देण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. याबाबत त्यांनीही गेल्या काही दिवसांपासून आपसात बैठका घेतल्यात.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतलाय. जर कोणत्याही पक्षातील एक जरी आमदार फुटला तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन भाजपला शह देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. पोटनिवडणुकीत तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार देऊन भाजपपुढे संघटीतरित्या आव्हान उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे नेते आहेत भाजपच्या रडारवर?

आमदार जयदत्त क्षीरसागर, खासदार विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचा समर्थक आमदार, आमदार दिलीप सोपल, आमदार नितेश राणे, आमदार नारायण राणे, काँग्रेस आमदार सुनील केदार, सुरेश धस आणि त्यांचा समर्थक एक आमदार , काँग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल, काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे, याच बरोबर कोल्हापूर मधील 2 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...