अखेर सरकार नरमले ! 19 पैकी 10 आमदारांचं निलंबन घेणार मागे

अखेर सरकार नरमले ! 19 पैकी 10 आमदारांचं निलंबन घेणार मागे

  • Share this:

vidhan bhavan3

25 मार्च : विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली. गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 मार्चला विधीमंडळाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यावेळी आमदारांचं निलंबन रद्द होऊ शकते.

विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहात घातलेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 31 डिसेंबरपर्यंत या 19 आमदारांना सभागृहात उपस्थित राहता येणार नाही. या आमदारांवर सभागृहाचा अवमान करणे आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे असे आरोप ठेवण्यात आले होते. सरकारच्या या कारवाईचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम होते. त्यामुळे विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे विधानसभेत विरोधकांच्या गैरहजेरीत कामकाज उरकण्यात आलं होतं. आमदारांचे निलंबन झाल्यापासून विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, आमदार निलंबन मागे घेण्याच्या बदल्यात विरोधकांनी विनियोजन विधेयक विधानपरिषदेत मांडण्याची संधी सरकारला दिलीय. विनियोजन विधेयक विधानपरिषदेत मंजूर होताच. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दुपारी विधानसभेत आमदार निलंबन मागे घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं निवेदन केलं.

विधानपरिषदेत विरोधकांची संख्या अधिक असल्याने सभागृहच कामकाज 3 दिवसापासून बंद आहे. बिरोधकानी ठरवलं असत तर विनियोजन बिल विधानपरिषदेत मांडता आलं नसत. मांडलं असत तरी ते नामंजूर करण्यात आलं असत. विनियोजन विधेयक विधानपरिषदेत फेटाळल्याने काही फरक फडत नसला तरी सरकारची मोठी नामुष्की झाली असती. हे पाहता राज्य सरकारने विरोधकासोबत चर्चा केली आणि विरोधकांनी आमदारांच्या निलंबनाची मुद्यावर विनियोजन विधेयक परिषदेत मांडण्यास हिरवा कंदील दिला.  त्याबदलात निलंबित 19 आमंदारापैकी 10 आमदारांच्या निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे.

सलग तीन दिवस विधीमंडळ कामकाजाला सुट्टी असल्याने २९ मार्चला विधीमंडळाचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी हे निलंबन रद्द होऊ शकते. पण या 10 आमदारांची नाव विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठारावायची अशी गुगली सत्तारूढ पक्षाने टाकलीय. आता कुणाला नाराज करायचं कुणाला खुश यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेर्यांची बैठक सुरु आहे. काही आमदारांचा निलंबन मागे घेताल तर पक्षातील उरलेले 9 आमदार नाराज होणार हे नक्की आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 25, 2017, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading