तरुणाची 'हाईट'; पोलिसभरतीसाठी चक्क लावला विग

 तरुणाची 'हाईट'; पोलिसभरतीसाठी चक्क लावला विग

  • Share this:

NSK WEG

25 मार्च : नोकरी मिळवण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, नाशिकमध्ये पोलीस भरती सुरू असताना एका तरुणाने फक्त ऊंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून डोक्यावर केसांचा नकली विग लावला. त्यांची ऊंचीही बसली. पण एका चाणाक्ष हवालदारामुळे त्याचे बिंग फुटलं आणि पकडला गेला.

किसन पाटील असं या तरूणाचं नाव आहे. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून पोलीस भरती सुरू आहे. त्यासाठी किसन पाटीलने त्याची ऊंची 175 सेंटीमीटरच्यावर दिसावी यासाठी हा बनावट विग बनवून घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं किसनची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याने डोक्यावर विग लावलं असल्याचं समजल आणि त्याचं बिंग फुटलं.

दरम्यान या प्रकारानंतर किसन पाटील या तरुणाला संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 25, 2017, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading