S M L

इंदू मिलची जागा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2017 07:20 PM IST

इंदू मिलची जागा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित

25 मार्च :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दादर इथल्या इंदू मिलच्या जमिनीचा ताबा राज्या सरकारकडे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत विधानभवनात हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे.

मात्र, या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या एकाही मंत्रीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे भाजप शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकचा चव्हाट्यावर आला आहे.

पाच वर्षांपूर्वी केंद्रातील आणि राज्यातील तत्कालीन सरकारने डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जामीन देण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर या जमीनीवरील उद्योगाचं आरक्षण उठवण्या व्यतिरिक्त सरकारने कोणतीही कार्यवाह केली नाही. केंद्रात भाजपची सरकार आल्यानंतर इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला गेला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमीपूजनही केले. परंतु राष्ट्रीय वस्त्रोद्योग ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात मिळण्याचा प्रश्न आद्यापही प्रलंबित होता.

दरम्यान, राज्य सरकारने इंदू मिलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी आरक्षित करण्याबाबतची कायदेशील कार्यवाही पूर्ण केली. मात्र जागेचं हस्तांतर रखडल्यामुळे स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरु करता येत नव्हतं. मात्र आता हा प्रश्वही मार्गी लागला असून स्मारकाच्या कामाला आत वेग येणार आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 01:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close