महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 30, 2017 02:10 PM IST

महेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची शक्यता

24 मार्च : महेंद्र सिंह धोनीने ज्या दिवसापासून इंटरनॅशनल क्रिकेटची कॅप्टनशिपमधून रजा घेतली. त्या दिवसापासून फक्त एकच प्रश्न सतत विचारला जातोय की, धोनी अजून किती खेळणार?, तर धोनी म्हणतो, 2019 वर्ल्ड कप खेळण्याची क्षमता अजूनपर्यंत तशीच आहे.

धोनी नुकताच विजय हज़ारे ट्रॉफीमध्ये सहभागी झाला होता. ज्यामध्ये धोनीने झारखंड टीमचे कर्णधारपद भूषवलं होते. धोनीच्या या कॅप्टनशीपमध्ये झारखंड टीमने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. सेमीफायनलमध्ये झारखंड टीमला पराभव पत्कारावा लागला तरी धोनीच्या कॅप्टनशिपवर अविश्वास दाखवणे शक्य होणार नाही. परंतु आता धोनी 2019 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची जी शक्यता दर्शवण्यात येते त्यावरुन हे स्पष्ट होते की, धोनी पुन्हा एकदा आपल्याला कॅप्टन कुल या अवतारात दिसू शकतो.

सध्या तरी धोनीने या बाबतीत काही स्पष्ट सांगितलं नाही.  2019 मध्ये खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप विषयी धोनीने असं सांगितलं आहे की, आता तर 2017 सुरू आहे, वर्ल्ड कपसाठी अजून दोन वर्ष शिल्लक आहेत. आणि या विषयी आतापासूनच भविष्यवाणी करणं काही गरजेच नाही. त्याचसोबत धोनी असं सुद्धा म्हणाला आहे की, 100 टक्के काय निर्णय होईल हे मी सांगू शकत नाही. कारण अजून दोन वर्ष आहेत आणि दोन वर्षे हा खूप मोठा काळ आहे. आणि बघायल गेलं तर टीम इंडियाच जसं शेड्यूल असत त्याप्रमाणे खेळलं तरी तुम्ही कधीना कधी "विंटेज कार" सारखे होणारच. म्हणून स्वत:ची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे.

परंतु धोनीच्या आताच्या खेळण्यावरुन हेच दिसुन येत आहे की, आता धोनी "विंटेज कार" मध्ये फीट बसायला लागला आहे. भारताला जूनमध्ये चॅंपियन ट्रॉफी खेळायची आहे, आणि यामध्ये धोनीचे स्थान महत्वाचे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...