अखेर तुकाराम मुंढेंची बदली

अखेर तुकाराम मुंढेंची बदली

  • Share this:

tukram_munde3324 मार्च : नवी मुंबईत धडाकेबाजी कामगिरी बजावणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुढे यांची अखेर बदली करण्यात आलीये. त्यांच्या जागी एस. रामास्वामी यांची नियुक्ती होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणारे, प्रशासनात पारदर्शकता आणणारे ऐवढच नव्हे दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणा-या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झालीये.

नवी मुंबई महानगरपलिकेतल्या भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुढेंनी कठोर भूमिका घेतल्यावर सगळेजण हादरले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने मुंढेंच्या विरोधात युद्धच पुकारले होते.

तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेनं मिळून सभागृहात आणलेला अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आहे. 105 विरुद्ध 6 मतांनी हा ठराव मंजूर झाला. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढेंची बाजू घेत ठराव नामंजूर केला. त्यामुळे नगरसेवकांची नाराजी आणखी वाढली.

अलीकडेच राज्य सरकारने सादर केलेल्या अनधिकृत घरे नियमित करण्याच्या धोरणावर आयुक्त मुंढे यांनी सर्वसाधारण सभेला विश्वासात न घेता राज्य सरकाच्या या धोरणाला विरोध करणारं पत्र दिलंय. त्यामुळे आधीच विरोधात असलेल्या नगरसेवकांच्या हाती आयतं कोलीत लागलं. आणि मुंढेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

अखेरीस वाढत्या विरोधामुळे तुकाराम मुढे यांची बदली करावी लागली. आता नवी मुंबई च्या आयुक्तपदी  एस. रामास्वामी यांची नियुक्ती होणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे नवी मुंबईत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 9:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading