...तर सेना हात उचलणारच, संजय राऊतांकडून गायकवाडांचं समर्थन

...तर सेना हात उचलणारच, संजय राऊतांकडून गायकवाडांचं समर्थन

  • Share this:

sanjay_raut424 मार्च : खासदार रवी गायकवाड यांच्या कृत्याचं शिवसेना पक्ष म्हणून कधीही समर्थन करणार नाही. पण आमच्या खासदारावर ही वेळ का आली याचा ही तपास झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच जिथे गरज पडेल तिथे शिवसेना हात नक्कीच उचलणार असं म्हणत त्यांनी गायकवाडांचं समर्थनंही केलं.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी पहिल्यांदाच शिवसेनेकडून प्रतिक्रिया आलीये. गायकवाड यांच्या कृत्याचं शिवसेना पक्ष म्हणून कधीही समर्थन करणार नाही. कुणालाही मारणं हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम नसू शकतो मात्र जिथे गरज आहे तिथे शिवसेना हात नक्कीच उचलणार अशी रोखठोक भूमिका राऊत यांनी मांडली. तसंच  हा प्रश्न एकट्या खासदाराचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा सुद्धा आहे. एअर इंडियाच्या सेवेमुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागतं असंही राऊत म्हणाले.

ज्या तातडीने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं. मुंबई, दिल्ली सारख्या अनेक एअरपोर्ट वर प्रवाशांची लूट होते तेव्हा कुठे जाते यांची तत्परता असा सवालही राऊत यांनी उपस्थिती केला.

रवींद्र गायकवाड यांच्यावर पक्ष म्हणून कारवाई करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई जी व्हायची ती होईल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading