बिल कमी करण्याच्या वादातून डॉक्टराला मारहाण

बिल कमी करण्याच्या वादातून डॉक्टराला मारहाण

  • Share this:

doctor_kolhapur3424 मार्च : राज्यभर सुरू असलेल्या डॉक्टरांची चर्चा सुरू असताना कोल्हापूरमध्ये पुन्हा डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना घडलीय.

शहरातल्या उद्यमनगर भागात वालावलकर ट्रस्टचे लक्ष्मी नारायण हॉस्पिटलमध्ये मुल्ला कुटुंबातील एक रुग्ण दाखल होता. आज (शुक्रवारी) या रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार होता. पण बिल कमी करण्याच्या वादातून डॉक्टर याकूब पठाण यांना रूग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केलीय.

माजी नगरसेवक रफिक मुल्ला आणि त्यांच्या 2 साथीदारांनी ही मारहाण केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.

विशेष म्हणजे डॉक्टरांनी रूग्णाची बील कमी करण्याची मागणी मान्य करत हे बिल १४ हजार ऐवजी १० हजार केलं होतं. मात्र, तरीही रुग्णाच्या नातेवाईकांनी ही मारहाण केलीय. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. पठाण यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 07:34 PM IST

ताज्या बातम्या