युतीच्या गुढीबाबत मंगळवारी 'मातोश्री'वर फैसला?

  • Share this:

SENA BJP WEB24 मार्च : शिवसेनेच्या सततच्या सरकारविरोधी भूमिकेमुळे भाजप आता अटीतटीवर आलीये. भाजप-शिवसेना युतीचं भवितव्य ठरवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

शिवसेनेच्या वाढत्या विरोधामुळे भाजपने आता वेगळं होण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केलीये. त्याचाच एक भाग म्हणून आता बोलण्यासाठी भाजपने पुढाकार घेतलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी पाटील आणि मुनगंटीवार उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना मैत्रीची गुढी राहणार की नाही याचा फैसला गुढीपाडव्याच्या दिवशी होण्याची शक्यता आहे.

भाजप शिवसेनेशिवाय काय करायचं यावर गंभीरपणे विचार करतंय. त्यामुळे मंगळवारी भाजप नेते उद्धव ठाकरेंना नक्की काय हवंय.शिवसेनेची नक्की काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. त्यामुळे या चर्चेतून का निर्णय घेतला जातो याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 07:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading