अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप मागे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2017 06:35 PM IST

अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप मागे

doctor strike324 मार्च : महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी आपला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आलाय. इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी डॉक्टरांच्या संघटनेची एक तास चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी संप मागे घेतलाय.

निवासी डॉक्टरांच्या मास बंकला पाठिंबा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने हा संप पुकारला होता. राज्यभरातले ४० हजार सदस्य यात सहभागी झाले होते. सरकारी आणि खाजगी रुग्णालयं यामुळे बंद होती. या संपामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले.

उद्या सकाळी 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, असा अल्टिमेटम मुंबई हायकोर्टाने डॉक्टरांना दिला होता. डॉक्टर उद्यापर्यंत कामावर रूजू झाले नाहीत तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. याआधी, सरकारने निवासी डॉक्टरांना सुरक्षा देण्याची हमी दिलीय. त्यासोबतच राज्यभरातल्या रुग्णालयांमध्ये ११०० सुरक्षारक्षक तैनात करण्याचं आश्वासनही सरकारने दिलंय. पण तरीही डॉक्टरांनी कामावर रुजू व्हायला नकार दिला होता.

याबाबत मार्डने केलेल्या आवाहनाला डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नव्हता.  डॉक्टरांच्या या आडमुठेपणामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्यायत. मुंबईतल्या ३ रुग्णालयांमध्ये १३५ जण दगावलेत. यात केईएममध्ये 53, सायन रुग्णालयात 48 तर नायर रुग्णालयात 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...