डाॅक्टरांचा संप रुग्णाच्या जीवावर बेतला, राज्यभरात 377 तर मुंबईत 135 रुग्ण दगावले

डाॅक्टरांचा संप रुग्णाच्या जीवावर बेतला, राज्यभरात 377 तर मुंबईत 135 रुग्ण दगावले

  • Share this:

doctor_strike_dath24 मार्च : धुळ्यात डाॅक्टराला मारहाणीच्या निषेधार्थ रजेवर गेलेल्या निवासी डाॅक्टरांचा संप रुग्णाच्या जीवावर बेतलाय. मुंबईतील तीन हाॅस्पिटलमध्ये तब्बल 135 जणांचा मृत्यू झालाय. राज्यभरात मृत्यूचा आकडा मोठा असल्याची भीती वर्तवली जात आहे.

राज्यभरातील तब्बल 4 हजाराहुन अधिक डाॅक्टर संपावर गेले. हायकोर्ट, सरकारने तंबी देऊन सुद्धा निवासी डाॅक्टरही रुजू होण्यास तयार नाही. गेल्या पाच दिवसांपासून हा संप सुरू होता. मात्र, या संपाच्या काळात रुग्णाचे अतोनात हाल तर झालेच काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले. एकट्या मुंबईत गेल्या 5 दिवसांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला.  सायन हाॅस्पिटलमध्ये ४८ केईम हाॅस्पिटलमध्ये ५३ तर नायर हाॅस्पिटलमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णांना वेळीच उपचार मिळू न शकल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यभरात डॉक्टरांच्या आंदोलनादरम्यान ३७७ रुग्ण दगावल्याचीही माहिती पुढे आली आहे. मिरजमधील जीएमसी रुग्णालयात ३५, सोलापुरातील व्हीएमएमसी रुग्णालयात २६, नागपुरातील जीएमसी रुग्णालयात १८, यवतमाळमधील व्ही. एन. जीएमसी रुग्णालयात १८, अकोला येथील जीएमसी रुग्णालयात २३, औरंगाबाद येथील जीएमसी रुग्णालयात ५७, अंबाजोगाईतील स्टार जीएमसी रुग्णालयात १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपण आदेश देऊनही निवासी डॉक्टरांनी आपलं सामूहिक रजा आंदोलन मागे न घेतल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने मार्डया निवासी डॉक्टरांच्या संघटनेला फटकावून काढलंय. आमच्यासमोर एक गोष्ट सांगता आणि बाहेर जाऊन भलतंच काही तरी सांगता हा काय प्रकार आहे असं विचारत कोर्टाने मार्डला चांगलंच धारेवर धरलं. आम्ही काल तुमच्या कामाचं कौतुक केलं ते सगळं म्हणणं आम्हाला मागे घ्यावं लागेल असं कोर्टाने निवासी डॉक्टरांना सुनावलं.

तर दुसरीकडे सुरक्षेची हमी आणि इतर सगळ्या मागण्या मान्य करूनही डाॅक्टर कामावर येण्यास तयार नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांना विनवणी करतात, उच्च न्यायालय त्यांना कामावर रूजू होण्याच्या सूचना करतात तरीही हे कामावर येत नाहीत. आणखी किती संयम दाखवायचा ? इनफ इज इनफ, राज्यातील गरीब रूग्ण मृत्यूशय्येवर आहे. मी त्यांना हात जोडून कामावर कामावर रूजू होण्याची मी विनंती करेन. जर त्यांनी ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईस त्यांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी निवासी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading