ऐश्वर्या करण जोहरवर नाराज, करण श्रद्धांजली सभेला आलाच नाही

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2017 05:32 PM IST

ऐश्वर्या करण जोहरवर नाराज, करण श्रद्धांजली सभेला आलाच नाही

aish 1

24 मार्च : ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या-कृष्णराज राय यांच्या अंत्यसंस्काराला सगळं बाॅलिवूड हजर होतं. पण नव्हता तो करण जोहरच. तो त्यांच्या श्रद्धांजली सभेलाही पोचला नव्हता.त्यामुळे ऐश्वर्या त्याच्यावर नाराज झालीय.

ती त्याबद्दल काही बोलत नाहीय, पण बाॅलिवूडमध्ये यावर बरीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन,अभिषेक बच्चन यांच्याबरोबरच शाहरूख खान,सोनाली बेंद्रे, संजय लीला भंसाळी,कुणाल कपूर असे बरेच दिग्गज होते, पण नव्हता तो करण जोहरच.

असं म्हणतात की 'ऐ दिल है मुश्किल'पासून करण आणि ऐश्वर्यामध्ये तणाव सुरू झाला होता. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनुष्का नको, ही ऐश्वर्याची मागणी करणनं धुडकावली होती. अनुष्का शर्मा सिनेमाची हिराॅइन होती, आणि ऐश्वर्या स्पेशल अॅपियरन्समध्ये होती. त्यामुळे अनुष्काला डावलणं करणला शक्य नव्हतं. तेव्हापासून दोघांमध्ये फारशी मैत्री राहिलेली नाही.

त्यामुळे काही वाद नको,म्हणून करण लांबच राहिला. पण त्याच्या लांब राहिल्यानं नव्या वादाचा जन्म झालाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...