डाॅक्टरातला माणूसही मेला,नवजात बाळासह मातेला हाॅस्पिटलबाहेर काढलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2017 05:06 PM IST

डाॅक्टरातला माणूसही मेला,नवजात बाळासह मातेला हाॅस्पिटलबाहेर काढलं

abad_news324 मार्च : डॉक्टरांच्या संपामध्ये अत्यावश्यक सेवा देणं अनिवार्य असतानाही औरंगाबादमध्ये डॉक्टरांनी माणुसकी हरवून टाकलीय. हृदय हेलावून टाकणारा आणि संतापजनक प्रकार औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये घडलाय. एका प्रसूत झालेल्या मातेला अवघ्या काही तासांत हाॅस्पिटलमधून बाहेर काढलं. धक्कादायक म्हणजे या महिलेचं सिजेरियन ऑपरेशन झालं होतं.

आज पहाटे ४ वाजता सोनाली पोटे ही महिला प्रसूत झाली, त्यावेळी डॉक्टरांनी सिजेरियन आॅपरेशन केलं. मात्र त्यानंतर लगेच तिला हॉस्पिटलबाहेर काढण्यात आले. तिच्या पोटातून रक्त वाहत होते, तरीही डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाहीत. इतकंच काय तिला हॉस्पिटलमध्ये थांबूही दिले नाही. त्यामुळे तासाभराचं बाळ आणि सिजेरियन झाल्यानंतर रक्तस्त्राव होत असताना ही महिला आणि तिची आई सेंट्रल बस स्टॅन्डमध्ये बसली.

हा सगळा प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर तिला सकाळी ८ वाजता परत घाटी हॉस्पिटलमध्ये आणले. तेव्हाही नकार दिल्याने तिला गावाकडे पैठण तालुक्यातील टाकळी अंतरवाली येथे पाठवण्यात आले. आता हे डॉक्टर आहेत की कसाई हा प्रश्न पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...