एअर इंडियाचा बदला, गायकवाडांचं परतीचं तिकीट रद्द

एअर इंडियाचा बदला, गायकवाडांचं परतीचं तिकीट रद्द

  • Share this:

ravindra_gaikwad_air_india24 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियानंही चांगलाच धडा शिकवलाय. त्यांचं आजचं नवी दिल्ली ते पुणे हे तिकीटच रद्द करण्यात आलंय. एअर इंडियाच्या संघटनेनं लोकसभा अध्यक्षांना पत्रंही लिहिलंय. खासदारानं आमची माफी मागावी, असं त्या पत्रात लिहिलंय.

तर दुसरीकडे गायकवाड यांनी हवाई वाहतूक मंत्री यांना पत्र लिहून एअर इंडियाच्या कर्माचाऱ्या विरोधात तक्रार केलीये. माझ्या सोबत उद्धटपणे वागल्याचं त्यांनी म्हटलंय. रवींद्र गायकवाड यांनी त्यांचं स्पष्टीकरण शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडे दिलं आहे.

काल शिवेसेना पक्षाकडून खासदार रवी गायकवाड यांना अधिकृत जाब विचारला होता. दरम्यान गायकवाड यांची मुजोरी कायम आहे. मी माफी मागणार नाही, माफी त्यांनी मागावी, असं ते म्हणालेत. मी काहीही चूक केली नाही, दोष त्यांचा आहे. माझ्याबाबत उद्धव ठाकरे बोलतील, आमचे संसदेतले नेतेही बोलतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 04:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading