राजू श्रीवास्तव करतोय कपिल-सुनीलमध्ये पॅचअप

राजू श्रीवास्तव करतोय कपिल-सुनीलमध्ये पॅचअप

  • Share this:

raju

24 मार्च : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचा वाद काही संपत नाहीय. सुनीलपाठोपाठ अनेकांनी या शोला अलविदा केलं. आता या रिकाम्या जागांवर राजू श्रीवास्तव,एहसान कुरेशी आणि सुनील पाल येणार आहेत.

राजू श्रीवास्तव म्हणाला,'मी कपिल आणि सुनील यांच्यामध्ये पुन्हा मैत्री सुरू होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. दोघांनीही समोरासमोर बसून बोलायला पाहिजे. दोघंही मला मोठ्या भावासारखे मानतात.मला या बातचीतमध्ये कपिलच्या आईलाही सामील करून घ्यायचंय.त्यांना सगळे जण खूप मानतात.'

राजू श्रीवास्तवचे प्रयत्न तरी चालू आहेत. पाहू या काय होतंय ते, सध्या तरी राजू श्रीवास्तव,एहसान कुरेशी आणि सुनील पाल कपिलच्या शोमधून आपल्याला भेटायला येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading