इनफ इज इनफ, ऐकलं नाही तर कारवाई होणारच; मुख्यमंत्र्यांचा इशारा

इनफ इज इनफ, ऐकलं नाही तर कारवाई होणारच; मुख्यमंत्र्यांचा इशारा

  • Share this:

CM VIDHAB SABHA

24 मार्च :  सुरक्षेची हमी आणि इतर सगळ्या मागण्या मान्य  करूनही डाॅक्टर कामावर येण्यास तयार नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांना विनवणी करतात, उच्च न्यायालय त्यांना कामावर रूजू होण्याच्या सूचना करतात तरीही हे कामावर येत नाहीत. आणखी किती संयम दाखवायचा ? इनफ इज इनफ, राज्यातील गरीब रूग्ण मृत्यूशय्येवर आहे. आज शेवटची बैठक मी घेणार आहे, त्यात त्यांना हात जोडून कामावर कामावर रूजू होण्याची मी विनंती करेन. जर त्यांनी ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईस त्यांना सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी निवासी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला.

निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत निवदेन सादर केलं. डॉक्टरांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने फडणवीस चांगलेचं संतापले होते.

 डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत रजा आंदोलन सुरू केल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन, हायकोर्टाने गुरुवारी डॉक्टरांना कामावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी माघार घेतलेली नाही. हायकोर्टाने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या संदर्भात कोणते लेखी निर्देश दिले आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, हे पाहिल्याशिवाय कामावर रुजू होणार नाही, हीच भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे. त्यांच्या या अडमुठेपणावर मुख्यमंत्र्यांनी ताशेरे ओढले.

सामान्य नागरिक सरकारच्या तिजोरीत टॅक्सरुपी जो पैसा भरतो, त्याच जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आज शेवटचं सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा सज्जड दम मुख्यमंत्रींनी आंदोलक डॉक्टरांना दिला.

अजूनही वेळ गेलेली नाही, तात्काळ कामावर दाखल व्हा. डॉक्टर म्हणून घेतलेली शपथ आठवा. आता रुग्णांना मरण्यासाठी सोडता येणार नाही. सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला.सरकारची भूमिका इतकी सकारात्मक असतानाही रजेवर जाणं अजिबात योग्य नाही, असंही ते म्हणाले. एवढचं नाही तर, 5 दिवस तुम्ही रुग्णांना मरायला सोडता मग तुमच्यामध्ये आणि तुम्हाला मारहाण करणाऱ्यांमध्ये फरक काय उरला, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, स्टाफवर हल्ला करण निंदनीय आहेच. त्याच्याविरोधात कायदा तयार केला आहे. काही चूक आढळली तर तक्रार करु शकता, पण डॉक्टरांवर हल्ला करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

सरकारने आणखी किती संयम दाखवणं अपेक्षित आहे, असा उद्विग्न सवाल करत डॉक्टरांसोबत आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मी स्वत: चर्चा केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले डॉक्टरांच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 दिवसात मी राजीनामा देईन. इतकं करुन तुम्ही कामावर येत नसाल तर ही असवेंदनशीलता आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading