S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

माफीचा प्रश्नच नाही, शिवसेना खासदाराचा उद्दामपणा कायम

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2017 03:50 PM IST

माफीचा प्रश्नच नाही, शिवसेना खासदाराचा उद्दामपणा कायम

24 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलने बेदम मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांचा उद्दामपणा अजूनही कायम आहे. "मी का माफी मागू ? मी माफी मागणार नाही, पहिली एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग पुढे पाहू असे रविंद्र गायकवाड यांनी सांगितलं.

गायकवाड यांनी काल (गुरूवारी) दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्टच्या यादीत टाकले आहे. तसेच गायकवाड यांच्यावर फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सने बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांना आता जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट आदी कंपन्यांच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. असं असले तरी गायकवाड यांनी एअर इंडियाच्या या बंदीला भीक न घालण्याचा निर्णय घेतला आहे.


'आज संध्याकाळी 4.15 वाजता गायकवाड यांची फ्लाईट आहे. माझे विमानाचे तिकीट बूक असल्याने मी प्रवास करणारच. त्यांनी मला अडवून दाखवावं,' असं आव्हान करतानाच 'माझा वकील माझ्या प्रकरणाचं पाहून घेईल,' असे गायकवाड म्हणाले. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गायकवाड आणि विमानतळ प्रशासनादरम्यान पुन्हा वादावादी होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि त्याला २५ वेळा चपलाने मारले’’, अशी कबुली गायकवाड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 01:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close