दुबईतल्या घरासाठी शाहरूखला भरावा लागणार टॅक्स

दुबईतल्या घरासाठी शाहरूखला भरावा लागणार टॅक्स

  • Share this:

Shahrukh-Khan-House-in-Dubai6_adtubeindia

24 मार्च : आयकर विभागानं शाहरूख खानला दुबईमधल्या घरावरचा कर भरायचे आदेश दिलेत. शाहरूखला त्या घरापासून 67.2 लाख रुपये मिळतात. त्यावर त्याला टॅक्स भरावा लागणार आहे.

आयकर विभागाची नोटिस आल्यावर शाहरूखनं काही मुद्दे उपस्थित केले होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेल्या करारानुसार दुबईत असलेल्या संपत्तीवरचा टॅक्स त्या देशातच भरावा लागतो.

पण शाहरूखनं त्या घरावर कमाई केली, त्याचा उल्लेख इथल्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये करावा लागतो, असं आयकर खात्याचं म्हणणं पडलं.

2008मध्ये शाहरूखला दुबईचं घर भेट मिळालं होतं. त्यातून किंग खानला 96 लाख रुपये मिळाले होते. त्यावर 30 टक्के टॅक्स दिल्यानंतर त्याची कमाई ढाली 67.2 लाख. आणि त्यावर त्याला आता भारतात टॅक्स भरावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading