साडेसहा हजार स्क्रीन्समध्ये लागणार 'बाहुबली 2'

साडेसहा हजार स्क्रीन्समध्ये लागणार 'बाहुबली 2'

  • Share this:

bahu

24 मार्च : 'बाहुबली 2'चा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळीकडे बाहुबलीचीच हवा तयार झालीय. 'बाहुबली 2' हा चित्रपट भारतात साडेसहा हजार स्क्रीन्समध्ये लागणार आहे.भारतातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिलीज आहे. रिलीजआधी सिनेमानं 500 कोटींची कमाई केलीय.

याशिवाय उत्तर अमेरिकेत 750 स्क्रीन्समध्ये हा सिनेमा लागलाय. तर इतर अनेक देशांमधये 1000 स्क्रीन्समध्ये लागणार आहे.

हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये 'बाहुबली 2' रिलीज होणार आहे.हिंदी व्हर्जनचे हक्क यावेळीही करण जोहरच्या धर्मानं घेतले आहेत.पहिला भागही एक आठवड्याआधी रिलीज करण्यात येणार आहे.

एस एस राजामौली यांचा 'बाहुबली 2'चा ट्रेलर सर्वात जास्त बघितला गेलेला ट्रेलर आहे. रिलीजनंतर हा ट्रेलर सहा दिवसांत 8.75 कोटी लोकांनी पाहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading