आंदोलनाचा पाचवा दिवस; डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

  • Share this:

mard strike_kem

24 मार्च :  डॉक्टरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कामावर रुजु न होण्याच्या निवासी डॉक्टरांच्या आठमुठ्या भुमिके विरोधात आणि कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्यात येत आहे. याचिकाकर्ते अफाक मांडविया यांचे वकील दत्ता माने आज मुंबई हायकोर्टात यासंबंधीत याचिका दाखल करणार आहेत.  दरम्यान, आज दुपारी एकच्या सुमाराला मार्डचे डॉक्टक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे..

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला डॉक्टरांचा संप ‘मार्ड’ने अखेर गुरूवारी मागे घेतला आहे. पण अद्यापही राज्यातील निवासी डॉक्टर सेवेत रूजू झालेले नाहीत. त्यामुळे मार्डने या डॉक्टरांना सेवेत रूजू होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई हायकोर्टाच्या लेखी आश्वासनानंतरही निवासी डॉक्टर कामावर रूजू झालेले नाहीत.

निवासी डॉक्टरांचा रजेचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावे असं आम्ही आवाहन करत आहोत, असं मार्डच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका निवासी डॉक्टरांनी घेतली होती. त्यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, त्यानंतरही डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नव्हतं.

दरम्यान, आज दुपारी एकच्या सुमाराला मार्डचे डॉक्टक मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

डॉक्टरांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस : घटनाक्रम

* 12 मार्च 2017

डॉक्टर रोहन म्हामुणकर यांना धुळ्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण

* 18 मार्च 2017

डॉक्टर रोहीत तातेड या निवासी डॉक्टरला सायन रुग्णालयात रुग्ण दागवल्याने रुग्णाच्या नातेवाकांकडून मारहाण.

* 19 मार्च 2017

तातेड याला मारहाण प्रकरणी सायन रुग्णालयातील 500 डॉक्टर संपावर गेले

* 20 मार्च 2017

या दोन्ही घटनेनंतर राज्यातील 4000 निवासी डॉक्टर संपावर गेले आणि सरकारकडून सुरक्षेची मागणी केली

* 21 मार्च 2017

हे प्रकरण हाय कोर्टात गेलं आणि कोर्टाने निवासी डॉक्टरांना फटकारलं.तुम्ही सामन्य कर्मचा-यांसारखे वागू शकत नाही.जर तुम्हाल अशी भुमिका घ्यायची असेल तर राजनामा देऊन तुम्ही सर्व जण घरी बसं असं हाय कोर्टाच्या न्यायधीश मंजुळा चिल्लर यांनी डॉक्टरांना फटकारलं

* 22 मार्च 2017

या संपात इंडीयन मेडीकल असोसिएशनचे 40000 डॉक्टर सहभागी झाली.याचा परीणाम खाजगी रुग्णालयावर देखील झाला

*23 मार्च 2017

- कामावर परत या कारावई नाही - मुंबई हायकोर्टाचं डाक्टरांना सांगण

- तर डा2क्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन करणार - मार्डची कोर्टात माहिती

- मार्ड डॉक्टर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक

- डॉक्टरांच्या मागण्या मान्य

- रात्री उशीरा माऱ्डनं काढलं परिपत्रक

*24 मार्च 2017

- डॉक्टरांची आडमुठी भूमिका पाचव्या दिवशीही कायम

- जोवर लिखित मिळत नाही टतोवर कामावर रुजू होणार नसल्याची निवासी डॉक्टरांची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 24, 2017, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading