बच्चू कडूंची आसूड यात्रा धडकणार पंतप्रधानांच्या गावावर !

  • Share this:

bacchu_kadu3323 मार्च : आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी सीएम टू पीएम अशी आसूड यात्रा काढणार आहेत. 11 एप्रिलला नागपूरपासून ही यात्रा सुरू होणार आहे.

गुजरातमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गाव वडनगर इथं ही रॅली धडकणार आहे. या यात्रेत प्रहारचे कार्यकर्ते आणि एक हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. पंतप्रधानाचं गाव वडनगर इथं रक्तदान करुन या यात्रेचा समारोप होणार आहे.

राज्यातील 20 शहरातून ही यात्रा जाणार आहे. केंद्र सरकार उद्योगजगतासाठी दरवर्षी दोन हजार आठशे कोटी रुपयाच कर्ज माफ करत, मात्र आठ कोटी शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटी रुपये द्यायला सरकार तयार नाही अशी टीका बच्चू कडू यांनी केलीय. इस्लामपूर इथं शहिद अभिवादन मेळाव्यात बच्चू कडू यांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 11:05 PM IST

ताज्या बातम्या