आता भाजपचं सेनेवर दबावतंत्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचे 29 आमदार भाजपच्या संपर्कात ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 10:59 PM IST

uddhav_on_cm23 मार्च : या ना त्या मुद्यावर शिवसेनेचा वाढत्या विरोधामुळे भाजपने आता स्वबळावर सरकार उभारण्याची रणनीती आखली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी देण्याची तयारी सुरू केलीये. एवढंच नाहीतर मध्यावधी किंवा आमदार फोडाफोडी करून सरकार स्वत:च्या पायावर स्थापन करण्याची चर्चाही झाल्याचं कळतंय.

मंत्रालय असो की महापालिका निवडणूक प्रत्येक ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये वादावादी आता नवी राहिली नाही. त्यामुळे भाजपने आता स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू केलीये. भाजपची आज चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर  कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने प्लॅन बी वर चर्चा केली. यात भाजपपुढे 2 पर्याय भाजपच्या कोअर कमिटीमध्ये मांडण्यात आली. एक शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं. उत्तरप्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवल्यामुळे राज्यातही यश मिळेल असा भाजपला विश्वास आहे.

तर दुसरा पर्याय असा की,  आमदारांची फोडाफाडी करण्याचं.   काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 29 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस 14, राष्ट्रवादीचे 15 आमदार संपर्कात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सर्वाचे राजीनामे घेवून, पोटनिवडणूक घ्यायची या सर्वांना भाजपच्या चिन्हावर निवडून आणून सरकार स्थिर करायचं अशी रणनीती भाजपने आखलीये. त्यामुळेच येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात भूकंप घडतो का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 10:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...