मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 10:59 PM IST

मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण

mantralaya_marhan423 मार्च : गारपिटीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडलीये. रामेश्वर भुसारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्राचे शेतकरी रामेश्वर भुसारे मंत्रालयात आले होते. 2015 मध्ये गारपिट आणि अवकाळी पावसात भुसारेंच्या एक एकर शेतीचं नुकसान झालं होतं. त्यामध्ये 25 लाखांचं नुकसान झालं असा दावा भुसारे यांनी केला होता. सर्वत्र मागणी करूनही कुणी दाद देत नसल्यामुळे त्यांनी आज मंत्रालय गाठले. भुसारे हे कृषिमंत्र्यांना भेटले. मात्र त्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही. तरीही समाधान न झाल्यामुळे त्यांनी  गोंधळ घातला. पोलिसांनी समजूत घालून सुद्धा संबंधित शेतकरी याचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचं मंत्रालय सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...