सांगलीचे पोरं हुशार,बनवलं हवेवर चालवणाऱ्या गाडीचं इंजिन !

सांगलीचे पोरं हुशार,बनवलं हवेवर चालवणाऱ्या गाडीचं इंजिन !

  • Share this:

sangali23 मार्च : पेट्रोल किंवा इतर इंधनाचा वाढता खर्च आणि भविष्यात येणाऱ्या तुटवड्याचा विचार करता सांगलीतल्या इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानं हवेवर चालवणाऱ्या गाडीचं इंजिन बनवलंय. जर हे तंत्रज्ञान यशस्वी झालं, तर भविष्यात अनेक प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंधनाचा वाढता खर्च पाहता आता हवेवर चालणारी गाडी तयार करण्याचा संकल्प इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोडला. तो संकल्प या गाडीच्या निमित्तानं पूर्ण झालाय. ही गाडी आहे हवेवर चालणारी,  सांगलीतल्या एसबीजीआय कॉलेजमध्ये भरलेल्या एम्पायर टू के सेव्हटिन या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली होती.

अंधांना नेहमीच अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, तो टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बूट त्यांनी तयार केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी समाजातल्या विविध घटकांना फायद्याचे ठरणारे अनेक प्रकल्प तयार केलेत.

शहरातली वाढलेली कार पार्किंगची समस्या, कृषी, उद्योगक्षेत्रांच्या गरजांचा विचार करून या विद्यार्थ्यांनी नवी उपकरणे बनवली आहेत. ती भविष्यात समाजाच्या फायद्याची नक्कीच ठरणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 09:03 PM IST

ताज्या बातम्या