अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवा, निलेश राणेंचा बंडाचा झेंडा

अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवा, निलेश राणेंचा बंडाचा झेंडा

  • Share this:

nilesh_rane_on_chavan23 मार्च : नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांचे पूत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी अशोक चव्हाण हटाव मोहीम सुरू केलीये. अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवा अशी मागणी निलेश राणेंनी केलीये.

नारायण राणेंचे थोरले चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामाही दिला असून काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या अधोगतीस अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे काँग्रेस आता निलेश राणे यांच्या मागणीचा कसा विचार करते हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 07:49 PM IST

ताज्या बातम्या