S M L

...तर आम्हालाही निलंबित करा, विखे पाटलांचं विधानसभाध्यक्षांना पत्र

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2017 07:35 PM IST

vikhe_patil_4323 मार्च : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर 19 आमदारांना निलंबित करत असाल तर आम्हालाही निलंबित करा अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवारांनी घेतलीये. पवार आणि विखेंनी अशी मागणी करणारं पत्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंना लिहलंय.

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काँग्रेसचे 10 आणि राष्ट्रवादीचे 9 आमदार 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केलाय. बुधवारी विखे पाटलांनी राज्यापालांची भेट घेऊन आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली. आज त्यांनी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहून निलंबनाची मागणी केली.

शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई होत असेल तर मग आम्हीसुद्धा या मागणीवर आक्रमक होतो. आम्हाला सुद्धा निलंबित करा, अशी मागणीच राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहून केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 07:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close