विरोधकांच्या गैरहजेरीतच अर्थसंकल्प मंजूर

  • Share this:

vidhan bhavan323 मार्च : राज्याचा अर्थसंकल्प मंजूर होण्यापूर्वीच विरोधकांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सभात्याग केल्यामुळे विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्याचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय.

अर्थसंकल्प मंजूर झाला त्यावेळी शिवसेनेलाही अर्थसंकल्पाबाबत काहीही बोलण्याची संधी सत्ताधारी भाजपने दिली नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. अर्थसंकल्पावर बोलण्याची परवानगी मागूनही आम्हाला बोलू दिलं जात नाही. आमचा आवाज दाबायचाच असेल तर तसं स्पष्ट सांगा असा आक्षेप सेना आमदार विनय औटी यांनी नोंदवला. मात्र अर्थसंकल्पाच्या चर्चेवेळी शिवसेना पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा मांडण्याची शक्यता लक्षात घेऊनच भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा विधीमंडळाबाहेर सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 07:12 PM IST

ताज्या बातम्या