रजेवर गेलेले डाॅक्टर कामावर परतले -महापौर

रजेवर गेलेले डाॅक्टर कामावर परतले -महापौर

  • Share this:

vishwanath mahadeshwar23 मार्च : गेल्या तीन दिवसांपासून सामूहिक रजेवर गेलेले निवासी डॉक्टर पुन्हा एकदा कामावर रूजू झाल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलीय. त्यामुळे संध्याकाळपर्यंत पालिकेतील सर्व रूग्णालयांची परिस्थिती पूर्ववत होईल.

महापौरांनी बैठक घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पालिकेच्या रूग्णालयात कार्यरत असलेले सर्व निवासी डॉक्टर्स कामावर रूजू झाल्याची माहिती त्यांनी दिलीय. आतापर्यंत संपावर गेलेले १५२ डॉक्टर पुन्हा कामावर हजर झाले आहेत. संध्याकाळपर्यंत सर्व हॉस्पिटलमधील परिस्थिती पूर्ववत होईल.  जर काही डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीतर कायदेशीर कारवाई करू असंही विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 23, 2017, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading