होय,मी त्याला 25 वेळा सँडलने मारलं, रवींद्र गायकवाडांची कबुली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2017 05:09 PM IST

होय,मी त्याला 25 वेळा सँडलने मारलं, रवींद्र गायकवाडांची कबुली

ravindra_gaikwad23 मार्च : होय, मी 25 वेळा सँडलने मारलं. आम्ही खासदार झालो म्हणून काय प्रत्येकाच्या शिव्या खायच्या का ?, मी शिव्या खाण्यासाठी काही भाजपचा खासदार नाही. सेनेचा आहे. मी त्याला समजून सांगितलं पण त्याने कुठला खासदार ?, असं म्हणत अरेरावी केली म्हणून त्याला मारहाण केली अशी कबुली सेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिली.

शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केलीये. पुणे- दिल्ली विमानात ही घटना घडलीये. एअर इंडियानं या प्रकरणी चौकशी सुरु केलीये. रवींद्र गायकवाड हे दिल्ली- पुणे विमानातून प्रवास करीत होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं. पण त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसण्यास सांगण्यात आलं. यावरुन विमानातील कर्मचारी आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. या शाब्दिक वाद वाढत गेल्यानं संतापलेल्या गायकवाड यांनी कर्मचाऱ्यावर हात उगारला. झालेल्या घटनेचं गायकवाड यांनी समर्थन केलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...