...अशा बातम्या पसरवण्यामागे काँग्रेसचेच लोक, नारायण राणेंचा घरचा अहेर

  • Share this:

Narayan rane21

23 मार्च : मी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही, ना कोणत्या पक्षातील नेत्याशी माझी याबाबत चर्चा झाली आहे, असं काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर, अशा बातम्या पसरवण्यामागे काँग्रेसचेच लोक असल्याचा आरोप नारायण राणे यांनी काँग्रसेला घरचा आहेर दिला आहे. ते गुरूवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षातील विरोधकांवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंची काँग्रेसबाबतची नाराजी दिसून येत होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी त्यांचे फारसे चांगले संबंध नसल्याचे पाहायला मिळाले. त्यात नारायण राणेंचे मोठे पुत्र निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ भाजपने विरोधी आमदारांच्या निलंबनाच्या यादीतून नितेश राणेंचे नाव ऐनवेळी वगळल्याचे समोर आले. यामुळे राणेंची भाजप-शिवसेनेशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया आणि मीडियामध्येही नारायणे राणे काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या फिरत  होत्या. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मीडियाशी बोलताना नारायण राणे यांनीआपली भूमिका स्पष्ट केली.

एखाद्या कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा होत नाही. मी अधिवेशनादरम्यान सभापतींना विचारूनच मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, त्यानंतर मी काँग्रसे सोडणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या. हे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र आहे. मी काँग्रेसमध्ये आल्यापासून राणे कुटुंबियांना वेगवेगळ्या पद्धतीने डावलण्याचे प्रयत्न काहीजणांकडून केले जात असल्याचा आरोप करत या सगळ्याचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असंही ते बोलले. संघर्षचा माझा पिंड असून आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचं, असं नारायण राणे यांनी सांगितलं.

राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. सरकारला अधिवेशन चालू द्यायचे नाही. म्हणूनच चर्चा न करता अर्थसंकल्प मंजूर करून घ्यायचा असल्याने अधिवेशन चालू दिले जात नाहीये. अर्थसंकल्पावर मतदान झाल्यास विरोधक कमी असावे यासाठी 19 आमदार निलंबित केलं असल्याचही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 11:27 AM IST

ताज्या बातम्या