रवीनाचं 'मातृ' आणि श्रीदेवीचं 'माॅम' पोस्टर सेम टु सेम!

रवीनाचं 'मातृ' आणि श्रीदेवीचं 'माॅम' पोस्टर सेम टु सेम!

  • Share this:

mom-maatr

23 मार्च : रवीना टंडनच्या 'मातृ' सिनेमाचं फर्स्ट लूक रिलीज झालंय. सिनेमाच्या पोस्टरवर रवीना टंडनचं लूक एकदम प्रभावी दिसतंय. काही दिवसांपूर्वी श्रीदेवीच्या 'माॅम'चं पोस्टरही रिलीज झालेलं. दोन्ही पोस्टर्समध्ये खूप साम्य आहे. दोन्ही पोस्टर्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये 'आई' असं लिहिलंय.

रवीनानं सोशल मीडियावर हे पोस्टर रिलीज केलंय. सिनेमाची कथा आईभोवतीच फिरतेय. एक मुलीसाठी आईचा प्रवास यातून उलगडतो. तर श्रीदेवीनं माॅमचं पोस्टर शेअर करत लिहिलंय, जेव्हा एका महिलेला आव्हान दिलं जातं...

रवीना टंडनच्या 'मातृ-द मदर'चं दिग्दर्शन अशतर सैयदनं केलंय. सिनेमा 21 एप्रिलला रिलीज होईल. तर बोनी कपूरची निर्मिती असलेला 'माॅम' 14 जुलैला रिलीज होईल.

आता पाहायचं बऱ्याच गोष्टी सारख्या असलेले हे सिनेमे काय वेगळं देतायत ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 10:21 AM IST

ताज्या बातम्या