सैराटफेम आर्चीची छेड काढणाऱ्याला अटक

सैराटफेम आर्चीची छेड काढणाऱ्याला अटक

  • Share this:

IMG_1575

23 मार्च : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारी 'सैराट'फेम अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिचे राज्यातच नाही तर देशभरात लाखो चाहते आहेत. मात्र, अकलूजमध्ये एका तरुणाने रिंकूची छेड काढल्याची घटना समोर आली असून, या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

रिंकू राजगुरु हिची छेड काढल्याप्रकरणी दत्तात्रेय गरत या तरुणाला पोलिसांनी अटक केलं असून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकूची छेडछाड करणारा आरोपी ठाण्याचा रहिवासी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माळशिरस इथल्या दिवाणी कोर्टात आरोपीला उशिरा हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरु हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने रिंकूला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. या चित्रपटानंतर तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली की, ती जिथे जाईल तिथे तिचा लोक पाठलाग करतात. त्यामुळे तिला एक-दोन वेळा धक्काबुकीच्या घटनांचाही सामोरा करावा लागला होता.

दरम्यान, रिंकू सध्या दहावीची परीक्षा देत असून ती लवकरच ‘सैराट’च्या कन्नड रिमेकमध्ये झळकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 23, 2017, 10:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading