Elec-widget

चौथ्या दिवशीही डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन, राज्यभरात पडसाद

  • Share this:

doctors-strike-at-kem_b808e15c-646f-11e5-b95f-5445df9fcc89

23 मार्च : मार्डच्या डॉक्टरांचं सामूहिक रजा आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. बुधवारी मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं. मात्र, मार्ड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन आता जास्त चिघळण्याची शक्यता आहे.

मुंबईत काही सरकारी हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे राज्यभरातले खाजगी डॉक्टर आज संपावर आहेत.

मुंबईतील सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री सायन रुग्णालयामधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यांसंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. सायन हाॅस्पिटलबाहेर डॉक्टरांनी धरणं आंदोलन सुरू ठेवलं आहे. राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत.

आज हायकोर्टात डॉक्टरांविरोधातल्या कारवाईच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मार्डच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता, मात्र मार्ड आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्यानं आज हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...