बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस संघर्षाला सुरुवात

बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस संघर्षाला सुरुवात

  • Share this:

MUNDE213122 मार्च : सुरेश धस समर्थकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं बीड जिल्हा परिषदेची हातातोंडाशी आलेली सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून गेलीये. यामुळे बीड राष्ट्रवादीत सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना सुरू झालाय.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सर्वात जास्त सदस्य निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास पंकजा मुंडेंनी हिरावून नेल्यानं धनंजय मुंडेंचा तिळपापड झालाय. सुरेश धस यांनी ऐनवेळी विश्वासघात केल्यानं पराभव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

जिल्ह्यातले नेते स्वतःला शरद पवारांपेक्षा मोठे समजतात असा उलटा टोला सुरेश धस यांनी लगावलाय.

धस यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत राष्ट्रवादीने दिलेत. त्यामुळे आता सुरेश धस यांचं काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading