फेसबुक ओळखणार 'फेक न्यूज'

फेसबुक ओळखणार 'फेक न्यूज'

  • Share this:

facebook222 मार्च : सोशल मीडियात सध्या टॉप ट्रेंडचा अॅप म्हणजे फेसबुक...पण सध्या फेसबुकवर 'फेक न्यूज'ने थैमान घातलं आहे. गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यापासून फेसबुकने फेक न्यूज विरोधात काही उपाय शोधण्यास सुरुवात केली, कारण अमेरिकेच्या निवडणुकीवर या फेक न्यूजचा बराच परिणाम झाला. या आणि अशा अनेक फेक न्यूजचा आढावा घेत फेसबुकने अनेक वेगवेगळ्या फॅक्ट चेकिंग कंपन्यांची भेट घेतली आणि यावर अनेक उपाय शोधत आता फेसबुक नव्याने अपडेट झालं आहे. त्यातील नवीन वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकवर असलेल्या बातम्या खऱ्या की खोट्या हे आता आपल्याला समजणे सहज शक्य होणार आहे.

हे समजणांर कसं ?

ज्या बातम्या खोट्या असतील त्यावर फेक न्यूज आहेत म्हणून मार्क होईल आणि नंतर ती बातमी फॅक्ट चेकिंग कंपनीकडे पाठवली जाईल.

जर ती बातमी खरचं खोटी असेल तर त्या बातमीवर डिसप्यूट म्हणजेच त्या बातमीवर आक्षेप घेत ती बातमी त्वरित खोटी ठरवली जाईल. ती बातमी का खोटी ठरवली आहे. हे समजण्यासाठी आपल्याला त्या बातमी सोबत एक लिंक ही दिली जाईल.

फेसबुकनुसार, अशा बातम्या न्यूज फिडमध्ये फारच कमी प्रमाणात दिसतात. त्यामुळे आपण त्या जास्तीत जास्त प्रमाणात या बातम्या शेअर केल्याने नागरिकांमध्ये याची जागरुकता पसरते आणि त्याचा मेसेजही पहिल्या यूजर जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 9:50 PM IST

ताज्या बातम्या