ब्रिटनच्या संसदेवर दहशतवादी हल्ला, 12 जण जखमी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 10:13 PM IST

ब्रिटनच्या संसदेवर दहशतवादी हल्ला, 12 जण जखमी

landon_attack_new

22 मार्च :   लंडनमध्ये संसद परिसरात गोळीबाराची घटना घडलीये. या गोळीबारात 12 जण जखमी झाले असून हल्लेखोराने पोलिसाला भोसकलंय. सुरक्षा दलांला संशयिताला ठार करण्यात यश आलंय. हा दहशतवादी हल्ला असल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय.

ब्रेक्झिटनंतर दहशतवादी हल्ल्याने इंग्लंड हादरलंय.संसदेचं अधिवेशन सुरू होते. अचानक चाकू घेऊन आलेल्या हल्लेखोरानं संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरानं एका सुरक्षा कर्मचाऱ्याला भोसकलं आणि गोळीबार केला. सुरक्षारक्षकांनी प्रतिउत्तर देत हल्लेखोराला ठार मारलं. ही चकमक संपत नाही तेच

वेस्टमिनिस्टर पुलाजवर एका भरधाव कारने लोकांना चिरडलं. यात 12 जण जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी संसदभवन सील केलं. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये दुपारी 2.20 वाजता गोळीबार केला. भारतीय वेळेनुसार हा हल्ला रात्री 7.50 वाजता झाला. हा हल्ला जेव्हा घटला त्यावेळी पंतप्रधान थेरेसा मे हे संसदेत होते. या हल्ल्यानंतर त्यांना सुरक्षा दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं. संसदेला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सील केलं.

नेमकं काय घडलं?

Loading...

- ब्रिटनच्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना घटना

- चाकू घेऊन आलेल्या हल्लेखोरानं संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला

- हल्लेखोरानं एका सुरक्षा कर्मचाऱ्याला भोसकलं

- सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला ठार केलं

- संसदेला जोडणाऱ्या पुलावर एका गाडीनं काही लोकांना चिरडलं

- यात 12 जण जखमी झाले

- पंतप्रधान थेरेसा मे यांना सुरक्षा दलानं बाहेर काढलं

- संसदेत 200 खासदार अडकून पडले

- संसदेला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सील केलं

- ब्रिटनची संसद ही लंडनच्या मध्यवर्ती भागात आहे

- संसद परिसतारल्या सर्व भूमिगत वाहतूक सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...