सरकारकडून डाॅक्टरांचा संप मागे, डाॅक्टर मात्र संपावर ठाम

  • Share this:

doctors185915dl119822 मार्च : सलग तीन दिवसांपासून संपावर असलेल्या निवास डाॅक्टरांचा संप मागे घेतलाय अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. 8 वाजेपर्यंत रूजू होण्याचा अल्टीमेटम सरकारने दिलाय. पण दुसरीकडे डाॅक्टर मात्र संपावर ठाम आहे.

वैद्याकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि निवासी डॉक्टारांमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत निवासी डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचा दावा महाजन यांनी केलाय.

परंतु, दुसरीकडे आम्ही संपावर अजूनही ठाम असल्याचे निवासी डॉक्टर संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारकडून हा संप संपला असं महाजनांनी जाहीर केलंय. रात्री 8 वाजेपर्यंत डाॅक्टर रुजू झाले नाहीतर 6 महिन्याचा पगार कापण्यात येईल असा इशारा महाजनांनी दिलाय. त्यामुळे डाॅक्टरांचा संप मागे घेतला की नाही हे रात्री 8 वाजेनंतर स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading