भाजपची नितेश राणेंवर मेहरबानी,निलंबित आमदारांच्या यादीतून नावं वगळलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 09:46 PM IST

भाजपची नितेश राणेंवर मेहरबानी,निलंबित आमदारांच्या यादीतून नावं वगळलं

nitesh_rane422 मार्च :  अर्थसंकल्प सादर करत असताना गोंधळ करणाऱ्या 19 विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं. पण या यादीतून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांचं नाव वगळण्यात आल्याची बाबसमोर आलीये. त्यांच्यासह काँग्रेसचेच आमदार वीरेंद्र जगताप यांचंही नाव वगळण्यात आलंय. ही यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीये. त्यामुळे नितेश राणेंवर भाजप इतकी मेहरबानी का दाखवतंय असा प्रश्न निर्माण झालाय.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी बजेट सादर होताना पूर्ण वेळ गोंधळ घातला होता. बजेटनंतर त्यांनी बजेटच्या प्रतीही जाळल्या होत्या. याच कृत्यांसह टाळ वाजवणे, अध्यक्षांच्या आदेशाचं पालन न करणे या सर्व कारणांसाठी यांना निलंबित करण्यात आलंय. हे निलंबन 31 डिसेंबरपर्यंत आहे.

मात्र, निलंबित करण्याची आमदारांची यादी तयार करण्यात आली होती त्या यादीतून दोन आमदारांची नाव वगळ्यात आली. यामध्ये पहिलं नाव होतं नितेश राणे आणि दुसरं नाव होतं वीरेंद्र जगताप यांचं. या दोन्ही आमदारांच्या नावापुढे फुली मारण्यात आली. याचा अर्थ असा की एकूण 21 आमदारांचं निलंबित करण्याचं ठरलं होतं. पण नितेश राणे आणि वीरेंद्र जगताप यांचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे 19 आमदारांनाच निलंबित करण्यात आलं.

सेना आमदार माहितीच नव्हतं

भाजपने आमदार निलंबनाचा निर्णय नियोजन पद्धतीने घेतला. भाजपनं आपल्या आमदारांना व्हीप जाहीर केला होता. पण याची खबर शिवसेनेच्या आमदारांना कळू दिली नाही. मुळात शिवसेनेच्या आमदारांवरच्या कारवाईचा पत्ता नव्हता.  त्यामुळे आजच्या विशेष बैठकीत सेनेचे केवळ दोन आमदार उपस्थित राहिले.

Loading...

मतदान टाळण्यासाठी 19 जणांचा बळी

अर्थसंकल्पाला मंजुरीसाठी मतदान होणार आहे. यात शिवसेना विरोधात जाण्याची भाजपला भीती वाटते. भाजपचे 122 आमदार आणि अपक्ष 7, रासप 1, बहुजन विकास आघाडी 3, मिळून 133 संख्याबळ होते. तर काँग्रेस 42, राष्ट्रवादी 41 आणि शिवसेना 63 मिळून संख्याबळ 146 होते. यातून 19 आमदार वगळले तर संख्याबळ 127 होते. त्यामुळे भाजपला अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठीचा अडसर दूर होता अशी चर्चा रंगलीये.

कोणत्या आमदारांना निलंबित करण्यात आलं ?

1) जयकुमार गोरे, काँग्रेस

2) विजय वडेट्टीवार, काँग्रेस

3) अब्दुल सत्तार, काँग्रेस

4) संग्राम थोपटे, काँग्रेस  

5) अमर काळे, काँग्रेस

6) हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस

7) डी. पी. सावंत, काँग्रेस

8) अमित झनक, काँग्रेस

9) दीपक चव्हाण, काँग्रेस

10) कुणाल पाटील, काँग्रेस

1) अवधूत तटकरे, राष्ट्रवादी

2) संग्राम जगताप, राष्ट्रवादी

3) मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादी

4) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी  

5) राहुल जगताप, राष्ट्रवादी

6) वैभव जगताप, राष्ट्रवादी

7) जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी  

8) भास्कर जाधव, राष्ट्रवादी

9) वैभव पिचड, राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 07:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...