आमदारांचं निलंबन मागे घ्या, विखे पाटलांचं राज्यपालांकडे निवेदन

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 06:57 PM IST

vikhe_patil_4322 मार्च : अर्थसंकल्पाची होळी करणाऱ्या १९ आमदारांचं निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी या आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणीचं निवेदन राज्यपालांना सुपूर्द केलं.

कर्जमाफीसाठी अधिवेशन सुरू झाल्यापासून आम्ही मागणी करत होतो. मात्र कर्जमाफी करण्याची भूमिका सरकारतर्फे दिसली नाही. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याचं विखे पाटलांनी सांगितलं. आज अचानक विशेष बैठक घेऊन सरकारने निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून आमदारांचं हे निलंबन त्वरीत मागे घेण्याची मागणी विखेंनी राज्यपालांकडे केलीय. सरकारने विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका यावेळी विखे पाटलांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...