सोलापुरात 112 निवासी डॉक्टर निलंबित

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 06:23 PM IST

सोलापुरात 112 निवासी डॉक्टर निलंबित

solapur_23422 मार्च : डॉक्टरांच्या राज्यभरातील संपाला हायकोर्टाने फटकारल्यानंतर आज रुग्णसेवेते रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र त्याला प्रतिसाद न दिल्याने सोलापुरातील ११२ डॉक्टरांना निलंबित करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिलीय.

धुळ्यामध्ये डॉक्टराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील डॉक्टरांच्या संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला होता. मात्र त्याला हायकोर्टाने फटकारले होते. त्यानंतर राज्यभारातील निवासी डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सोलापुरातील निवासी डॉक्टरांनी त्याला दाद न देता संप सुरुच ठेवला. त्यामुळे रुग्णांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. त्यामुळे अखेरीस महाविद्यालय प्रशासनाने तब्बल ११२ निवासी डॉक्टरांना निलंबित केलंय. त्यासोबतच त्यांचे एम.डीच्या पदवीचे रजिस्ट्रेशन रद्द करुन शासनाने दिलेल्या सुविधा लवकरच रद्द होणार असल्याचेही अधिष्ठाता डॉ. पोवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...