S M L

चंद्रपूर,लातूर आणि परभणी पालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं

Sachin Salve | Updated On: Mar 22, 2017 04:39 PM IST

NAGPUR ELECTION copy22 मार्च : 10 महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांना आता सुरूवात झालीये. चंद्रपूर,लातूर आणि परभणी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे.

तिन्ही पालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान आणि 21 ला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकांचा कार्यक्रम जाहीर केला. या घोषणेसह जळगांव, कल्याण डोंबिवली, सांगली महापालिका प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.तर मालेगांव 14 जून आणि भिवंडी पालिकेची मुदत 10 जूनला मुदत संपत आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय घ्यायला अजून वेळ आहे. तसंच पनवेल महापालिकाबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असंही आयोगाने स्पष्ट केलं.

असा आहे तीन महापालिकांचा कार्यक्रम

 चंद्रपूर, लातूर आणि परभणी पालिकांसाठी निवडणूक

Loading...

- 19 एप्रिलला मतदान

- 21 एप्रिलला मतमोजणी

- आजपासून तिन्ही पालिकांत आचारसंहिता लागू

एका जागेसाठी पोटनिवडणूक

- जळगांव महापालिका

- कल्याण डोंबिवली महापालिका

- सांगली महापालिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 04:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close