रात्री 8 पर्यंत रूजू व्हा नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार, सरकारचा डाॅक्टरांना इशारा

रात्री 8 पर्यंत रूजू व्हा नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापणार, सरकारचा डाॅक्टरांना इशारा

  • Share this:

doctors_strike422 मार्च : सलग तिसऱ्या दिवशी सामूहिक रजेवर जाणाऱ्या निवासी डॉक्टरांना सरकारनं चांगलाच दणका दिलाय. आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावर या नाहीतर 6 महिन्यांचा पगार कापला जाईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिलाय.

राज्यात अनेक ठिकाणी निवासी डॉक्टरांवर कारवाई व्हायला सुरुवात झालीय. नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलंय तर मेयो रुग्णालयात 300 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय. तर मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होस्टेल सोडण्याची नोटीस सोपवण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टात डॉक्टरांबाबतची याचिका उद्या सुनावणीसाठी घेतली जाणार आहे. मुख्य न्यायाधीश मंजुळा चेळ्ळूर आज कोर्टात नाहीयेत. त्यामुळे सुनावणी उद्यावर ढकलण्यात आलीय.

मार्डच्या प्रतिनिधींशी बैठक

तर दुसरीकडे मार्डच्या डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी स्वतः गिरीश महाजन आणि मार्डच्या प्रतिनिधींची बैठक सुरू आहे. या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत आंदोलन मागे न घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा सरकारनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading